Online admissions are open for academic year 2020-21

Online प्रवेश प्रक्रिया २०२०-२१

महाविद्यालयाने covid -19  चा प्रादुर्भाव लक्षात घेता शैक्षणिक सत्र  २०२० - २१ मध्ये बी.ए., बी.कॉम., बी.एस्सी., द्वितीय व तृतीय वर्षाच्या तसेच एम.ए. मराठी व इंग्रजी आणि एम.कॉम. द्वितीय वर्षाच्या वर्गात प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या नियमित महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन प्रवेशाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे  

सूचना : 

  • Online प्रवेश प्रक्रिया फक्त द्वितीय व तृतीय वर्गात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आहे.
  • हा Online प्रवेश अर्ज फक्त उन्हाळी २०२० च्या परीक्षेस बसलेल्या (परीक्षा फॉर्म भरलेल्या ) नियमित प्रथम व द्वितीय वर्गाच्या विद्यार्थ्यांसाठी आहे.
  • इतर विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी महाविद्यालयात येऊन प्रवेश समितीस भेटावे.
  • हा online प्रवेश अर्ज फक्त provisional ऍडमिशन साठी आहे. विद्यापीठाद्वारे आपल्या वर्गाचा निकाल घोषित झाल्यानंतर आपण महाविद्यालयात येऊन प्रवेश अर्ज घेऊन त्यासोबत आवश्यक ते कागदपत्र जोडून कार्यालयात जमा केल्यानंतरच आपला प्रवेश निश्चित होईल.
  • शैक्षणिक सत्र २०२० - २१ मध्ये भारत सरकार शिष्यवृत्ती अंतर्गत प्रवेश घेत असलेल्या विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीचा अर्ज आवश्यक त्या कागदपत्रासह  ०१ ते १५ डिसेंबर २०२० या कालावधीत  महाविद्यालयात जमा करणे आवश्यक आहे, अन्यथा पूर्ण फी भरावी लागेल.  

Online प्रवेश अर्ज भरण्यापूर्वी खालील कागदपत्रे स्कॅन करून किंवा फोटो आपल्याकडे असावेत.

Online प्रवेश अर्ज भरण्यापूर्वी खालील कागदपत्रे स्कॅन करून किंवा फोटो आपल्याकडे असावेत.

1. उन्हाळी २०२० मध्ये सेमिस्टर परीक्षेचा फॉर्म भरलेला असणे आवश्यक आहे, तसेच आपला बैठक क्रमांक माहित असणे आवश्यक आहे. [बैठक क्रमांक (Roll No.) महाविद्यालयाच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे]

2. मागील सर्व सेमिस्टरच्या गुणपत्रिका :
  *द्वितीय वर्षात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी फर्स्ट सेमिस्टर ची गुणपत्रिका. 
  *तृतीय वर्षात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी १, २, ३, सेमिस्टरच्या गुणपत्रिकेची एकच pdf  फाईल तयार करावी.


ज्या विद्यार्थ्यांना online प्रवेश अर्ज भरण्यास अडचण येत असेल त्यांनी खालील प्राध्यापकांशी संपर्क साधावा.

कला विभाग

डॉ. राजेंद्रसिंह देवरे–  9423652664

डॉ.ज्ञानेश्वर गोरे- 9175710375

वाणिज्य विभाग

डाॅ. नरेंद्र शेगोकार- 9422989632

डॉ. विनोद बंसिले- 8855080050

विज्ञान विभाग

प्रा. पवन कदम - 8275009134

प्रा. निलेश काकडे – 9423947797

प्रा.पांडुरंग पवार- 9423840034

डाॅ. महेंद्र साळवे- 9960055304